अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहेत. त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या जाण्यानं दु:खात आहेत. मात्र त्यांचा एक असाच कलाकार चाहता अमेय वाघने इरफानला वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
इरफान खानला 2018मध्ये त्याला झालेल्या आजाराविषयी समजलं होतं. त्यावेळी इरफानने उपचार सुरु असताना त्याच्या चाहत्यांना एक पत्र लिहीलं होतं. हे पत्र इंग्रजी भाषेत होतं. मात्र याचं पत्राच मराठी अनुवाद करून अमेय वाघने इरफानचं हे पत्र मराठीत वाचलंय. त्याने त्याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये अमेय लिहीतो की, “चांगले कलाकार खूप असतात! पण आपल्या कलेतून क्रांती घडवायची ताकद मोजक्या कलाकारांमध्ये असते! इरफ़ान खान त्यापैकी एक होते. “बिल्लू” ह्या सिनेमात त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली आणि ह्या महान अभिनेत्याचं काम जवळून अनुभवता आलं ! त्यांनी cancer ची treatment सूरु असताना आपल्या चाहत्यांसाठी एक पत्र लिहिलं होतं! ते इंग्रजीत होतं! त्या पत्राचा मी मराठी अनुवाद केला आहे! त्याचं हे वाचन! भावपूर्ण श्रद्धांजली”यावेळी इरफानसोबत 'बिल्लू' या सिनेमात काम केल्याची आठवणही अमेयने सांगीतली आहे.