आर. जी. मुव्हीज प्रॉड्क्शनच्या पहिल्या वहिल्या सिनेमाच्या म्युझिक आणि ट्रेलर लाँचिंगवेळी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. हा सोहळा अंधेरीमध्ये पार पडला.
यावेळी सिनेमातील प्रमुख कलाकार रोशनी वालिया, गौरव गर्ग, हरजिंदर सिंह, विकास श्रीवास्तव, अमांडा रॉड्रिओ हे कलाकार उपस्थित होते. याशिवाय दिग्दर्शक नितिन चौधरी आणि के.के. मकवाना हे देखील उपस्थित होते.
आय अॅम बन्नी ही एका मुलीची कथा आहे. खेड्यात रहात असलेल्या या मुलीची शिक्षणाची ओढ आणि प्रवास याचं दर्शन प्रेक्षकांना या सिनेमातून घडेल.
या सिनेमातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी प्रेरणादायी गवसेल अशी आशाही दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. या सिनेमातील सर्वच गाणी सुश्राव्य आहेत. ‘या सिनेमाचं वैशिष्ट्यपूर्ण संगीत निर्माण करणं हे आमच्या संगीतकारांसमोर आव्हानच होतं.’ असं सिनेमाचे निर्माते अनिल गर्ग यांनी सांगितलं. हा सिनेमा १८ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होईल.