By  
on  

Lockdown: सई आणि सिध्दार्थ चांदेकरला या गोष्टीची भेडसावतेय चिंता

आज करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे.आता तर लॉकडाऊन पुढील दोन आठवडे म्हणजे १७  मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. पण आता हा बराच काळ लोटला आहे,त्यामुळे सर्वांनाच आता हळूहळू कंटाळा येऊ लागला आहे.

या लॉकडाऊनमुळे आपणसुध्दा आपल्या प्रियजनांना , जवळच्या मित्रांना भेटू शकत नसल्याने चलबिचल वाढली आहे. तर इकडे मराठी सिनेसृष्टीतले दोन आघाडीच्या कलाकारांना मात्र वेगळीच चिंता भेडसावते आहे, तसं पाहिलं तर हा विषय गंभीर आहे, असं म्हटलं तरी चालेल....पण तुम्हालाही अनुभव असेल कारण तुम्हीसुध्दा तुमच्या मित्रांना मिस करताय..

अहो, असे काय चिंतेत पडलात....हे दोन मित्र म्हणजे सई ताम्हणकर व सिध्दार्त चांदेकर. त्यांची ही व्यथा म्हणजे..लॉकडाऊनमुळे एकत्र बसून  या दोघांना गप्पा ठोकता येत नाहीएत, तर कहर म्हणजे त्यांच्याकडे खुप सारं गॉसिप आहे जे एकमेकांसोबत शेअर करायचं ..त्यासाठी त्यांच इंधन भडकलंय असं सिध्दार्थचं म्हणणं आहे.,,तर सई त्याची पोस्ट शेअर करत म्हणते....ए भिडू ...असो कोणाचं काय तर कोणाचं काय...पण लॉकडाऊन लवकर संपू दे व हया दोघांची भेट होऊन दोघांना एकत्र बसून खुप सा-या गप्पा ठोकता याव्यात हीच पिपींगमून मराठीकडून सदिच्छा !

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive