By  
on  

या गोष्टीसाठी प्राजक्ताने मानले तिच्या दिग्दर्शकांचे आभार

सिनेमांमध्ये हिरो आणि हिरोईनसारखी जबरदस्त एन्ट्री करायची इच्छा बहुतांश कलाकारांची असते. त्यांच्या एन्ट्री सीनला धमाकेदार म्युझीक वाजणार, स्लो मोशल इफेक्ट येणार आणि बरच काही. तो एन्ट्री शॉट त्यांना भरपूर आनंद आणि समाधान देऊन जातो. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्याही बाबतीत असच झालय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कमी चित्रपट केले परंतू; जवळपास सगळ्याच सिनेमांमध्ये गोड Entry shots माझ्या वाट्याला आले... त्या साठी माझ्या दिग्दर्शकांचे आभार ️ हा पार्टी मधील Entry shot, premier च्या वेळी shoot केलेला. ( मागे अक्षय चा ऐकू येईल पहा ) . ह्याची आज आठवण झाली कारण “पार्टी” आता ४ वाजता @zeetalkies वर लागणारे.. बाहेर कुठे जाणार नसाल तर नक्की पहा . #prajaktamali @

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

‘पार्टी’ या मराठी सिनेमात प्राजक्ता माळी झळकली आहे. हा सिनेमा टेलिव्हीजनवर दिसणार असल्याची पोस्ट तिने केली. मात्र या पोस्टमध्ये तिने खास कॅप्शन लिहीलय. हे कॅप्शन आहे तिने आत्तापर्यंत काम केलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शकांसाठी आहे. आत्तापर्यंत मोजक्याच मराठी सिनेमांमध्ये प्राजक्ता झळकली आहे. मात्र त्या सिनेमांमध्ये वाट्याला आलेले एन्ट्री शॉर्ट्ससाठी ती तिच्या दिग्दर्शकांचे आभार मानत आहे. ती पोस्टमध्ये लिहीते की, “मी चित्रपट केले परंतू; जवळपास सगळ्याच सिनेमांमध्ये गोड Entry shots माझ्या वाट्याला आले... त्या साठी माझ्या दिग्दर्शकांचे आभार.”

असं लिहीत तिने ‘पार्टी’ सिनेमाच्या प्रिमीयरदरम्यान स्क्रिनवरून स्वत:ची एन्ट्री शूट केलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive