लॉकडाउनच्या काळात काहींना त्यांचे छंद जोपासण्याचा वेळ मिळाला आहे. यातच चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या कलाकारांना या निमित्ताने त्यांचे छंद जोपासण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेता भूषण प्रधानला कुकिंगची आवड आहे. आणि सध्या लॉकडाउनच्या काळात त्याने किचनचा ताबा घेतलेला दिसतोय. लॉकडाउनमध्ये फिटनेसकडे लक्ष देण्याव्यतिरिक्त भूषण कुकिंगही करतोय. सोशल मिडीयावर तो त्याने बनवलेल्या पदार्थांचे फोटोही पोस्ट करतोय. नुकतच त्याने रस्सम आणि भातचा बेत केला होता. त्याचेही फोटो त्याने पोस्ट केले आहेत.
याशिवाय विविध पदार्थ भूषण बनवतोय. यादरम्यान त्याच्या आईला स्वयंपाक घरात चांगलीच मदत झाली असेल यात शंका नाही.