कोणताही प्रवास हा एक वेगळा अनुभव देऊन जातो. या प्रवासातली ठिकाणं, रस्ते, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्ती या त्या प्रवासाच्या आठवणी असतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही तिच्या एका खास प्रवासातली आठवण शेयर केली आहे.
दोन वर्षांपूर्वी सोनाली पॅरीसला गेली होती. तिथे सोनालीची तिच्या प्रवासात भेट झाली एका चिमुकलीशी. या चिमुकलीचं नाव आहे अनाहीता. या गोंडस मुलीसोबत सोनालीची या प्रवासात चांगलीच मैत्री झाली होती. आणि नुकतेच या भेटीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अनाहीताने सोनालीला नुकताच एक व्हिडीओ पाठवला आहे. तो व्हिडीओ पोस्ट करत सोनालीने त्या प्रवासातल्या या लिटील स्ट्रेंजरसोबतच्या आठवणी जागवल्या. सोनालीने या चिमुकलीचे फोटो पोस्ट करत लिहीलं आहे की, “दोन वर्षांपूर्वी याच दिवशी पॅरीसमध्ये मी एका लिटील स्ट्रेंजरला भेटले होते. मी माझ्या तिसाव्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनसाठी तिथे गेले होते. आम्ही दोघी नाचलो, धावलो, मी तिच्या केसांच्य पोनी टेल्स बनवल्या, तिला झोपवलं. आणि मुख्य म्हणजे आम्ही कुणाला कळणार नाही असे संभाषणही केले. या गोष्टीला दोन वर्षे झाली आहेत जेव्हा आम्ही दहा दिवस एकत्र होतो. तिने नुकताच मला व्हिडीओ पाठवला आहे. आणि आता ती चार वर्षांची झाली आहे. काही नाती या अपेक्षा आणि स्पष्टीकरणाच्या पलीकडे असतात.”
सोनालीने या पोस्टमध्ये या चिमुकलीसोबत काही गोड क्षण पोस्ट केले आहेत.