‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या मागील वर्षी आलेल्या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत झळकले होते. राजकीय विषयावर असलेल्या या वेब सिरीजमध्ये या कलाकारांच्या वेगळ्या भूमिका, त्यांचा अभिनय सरप्राईज करणारा ठरला. वेब सिरीज पाहणाऱ्या प्रेक्षकांनीही याला पसंत केलं होतं.
नुकतीच या वेब सिरीजला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेता सिध्दार्थने या वेब सिरीजच्या टीमसोबतचा सेल्फी फोटो पोस्ट करत या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये सिध्दार्थ लिहीतो की, “माझ्या सगळ्यात आवडत्या प्रोजेक्टला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. तुम्हा सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव सन्मानपूर्वक होत आणि नेहमीच असेल. माझ्या आतमध्ये दडलेला आशिष पाटील शोधून काढण्यासाठी धन्यवाद” सिध्दार्थने या वेब सिरीजमध्ये आशिष पाटील नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. सिध्दार्थने यात प्रिया बापटच्या भावाची भूमिका साकारली होती. शिवाय या वेब सिरीजमधील त्याच्या भूमिकेला खलनायकी शेडही होती.
तर दुसरीकडे प्रिया बापटनेही या आठवणींना उजाळा दिला आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शक नागेस कुकुनूर यांच्यासोबतचा सेल्फी फोटो प्रियाने पोस्ट केला आहे. ती या पोस्टमध्ये म्हणते की, “ मला पूर्णीमा गायकवाडची भूमिका देण्यासाठी धन्यवाद. आत्तापर्यंत साकारलेलं सगळ्यात ताकदीची भूमिका. आणि मी तिच्यावर खूप प्रेम करते. पहिल्या सिझनला एक वर्ष पूर्ण होत आहेत.”
या वेब सिरीजमधील प्रिया बापटच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. या लॉकडाउनमध्ये या वेब सिरीजमधील हे कलाकार या वर्षभरापूर्वीच्या आठवणीत रमले आहेत.