आज दिवसेंदिवस करोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी घरात राहून सुरक्षित राहायचं आहे. सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
शूटींगलासुध्दा सक्तीची रजा असल्याने सेलिब्रिटी हा वेळ कुटुंबियांसोबत घालवत आहेत. मराठीतली ग्लॅमरस आणि हॉट व तितकीच चुलबुली अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आईसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शायनिंग मारणा-या अमृताची तिची आईच धम्माल शाळा घेत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल.
खुपच छोट्या असलेल्या हा व्हिडीओ शेअर करताना अमृताने त्याला धम्माल कॅप्शनही दिलं आहे. " मी आज दोनवेळचं जेवण बनवल्यावर...आई म्हणते, “आता उद्या पासुन तुच बनव सगळं”
हा अफलातून व्हिडीओ पाहून तुम्हीसुध्दा खळखळून हसाल.अमृताप्रमाणेच तिच्या आईचासुध्दा नटखट व मस्ती मूडमधील अंदाज पाहायला मिळतोय. दोघीही खुप क्यूट दिसतायत.
नेहमीप्रमाणेच अमृताच्या या भन्नाट व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.