By  
on  

 पाहा Video : रिंकूने राजगुरुच्या घरी आला हा नवा पाहुणा

रिंकू राजगुरु सध्या लॉकडाउनमध्ये तिच्या कुटुंबासोबत घरातच आहे. या दरम्यान नुकतीच तिची ‘हंड्रेड’ नावाची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमधील रिंकूच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकू सध्या घरात राहून तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. शिवाय कुकिंग, व्यायाम, वाचन या विविध गोष्टीही करतेय. रिंकूला प्राणी-पक्षांची प्रचंड आवड आहे. ती प्राणी मात्रांवर प्रेम करणाऱ्यांपैकीच आहे.

नुकतच रिंकूच्या मांजरीने गोंड पिल्लांना जन्म दिला होता. त्या पिल्लांसोबतही ती वेळ घालवते. तर आता तिच्या घरात आलय नवं पाहुणं. काही चिमण्यांनी घरटं तुटल्याने तिच्या घरातच त्यांचं घर करुन घेतलं आहे. नुकतच त्या चिमणीने दिलेल्या गोंडस पिल्लासोपबतही रिंकू वेळ घालवतेय. नुकताच तिने एक व्हिडीओही  पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये रिंकू लिहीते की, “असं म्हणतात की चिमणी च्या पिल्लाला हात लावला तर चिमण्या पिल्लाला जवळ घेत नाहित मारून टाकतात पण,अस काहीच नसत हे आत्ता कळाल.”

रिंकूने हात लावल्यानंतही चिमण्यांनी त्या पिल्लाला जवळ केलं असल्याचं रिंकू म्हणतेय. रिंकूच्या या गोंडस व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive