सध्याच्या लॉकडाउनच्या काळात लोकं जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. काही जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत, छंद जोपासत आहेत तर काही कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. लॉकडॉउनमध्ये मिळालेल्या या वेळेचा सुदपयोग करत आहेत. यातच जुन्या फोटो संग्रहातून काही सोनेरी आठवणींचा साठा सापडतो आणि मग त्या आठवणी जाग्या होत आहेत.
अभिनेता सचिन पिळगावकर यांनी अशीच एक आठवण शेयर केली आहे. त्यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये बॉलिवुडचे बडे स्टार्स पाहायाला मिळत आहते. सचिन पिळगावकर यांच्यासोबत या फोटोमध्ये सलमान खान, आमिर खान, सुभाष घई, गोविंदा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ हे कलाकार पाहायला मिळत आहेत. 'सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे' या गाण्यात हे सगळे कलाकार एकत्र झळकले होते. या गाण्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत दिसले होते. या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानची ही आठवण आहे.
जुन्या आठवणींमध्ये डोकावणं मजेशीर असतं. आणि तोच आनंद हा फोटो सचिन पिळगावकर यांना देऊन गेला असेल यात शंका नाही.