आज करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. देशभर लॉकडाऊनचा काळ हा १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण सक्तीट्या रजेवर आहेत. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. स्वयंपाकात रमले आहेत.
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक हा आपल्या विनोदबुध्दीसाठी खुप प्रसिध्द आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. पण एका चाहतीने मात्र प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो या उक्तीनुसार तिने हे बरोबर ओळखून प्रसादच्या आयुष्यात अग्रस्थान मिळवलंय.... बरोबर ओळखलंत तुम्ही.....आम्ही बोलतोय प्रसादची पत्नी मंजिरी ओकबद्दल.
आपल्याला माहितच आहे, प्रसादच्या प्रत्येक प्रोजक्टमध्ये त्याला खंबीर साथ देणारी मंजिरी ही मुळात खुप मोठी सुगरण आहे आणि याची प्रचिती आली ते तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन. विविध राज्यांचे खास पदार्थ करुनच नाही तर त्यासाठी यथासांग मांडणी व सजावट करुन ते सादर करतेय.
लॉकडाऊन दरम्यानच्या मंजिरीच्या पाककलेचं खास कौतुक होत आहे.
मंजिरी म्हणते, तुम्हाला ज्यात आनंद वाटतो ते करा, मन गुंतवून ठेवा.