जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952 वर पोहचली आहे. या करोना युध्दाशी लढताना सर्वच सरकारी यंत्रणा, डॉक्टर-नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस हे युध्द पातळीवर लढत आहेत. या करोनाला आळा घालण्यासाठी देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, करोनामुक्त झालेले रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर-नर्सेस आदींंना समाजात नीट वागणूक मिळत नसल्याच्या घटना आता समोर येत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने शितली म्हणून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री शिवानी बावकर मात्र याबाबत खास जनजागृती करताना पाहायला मिळते.
>
शिवानी या व्हिडीओद्वारे खास संदेश देताना म्हणते, करोनावर विजय प्राप्त करुन परतणा-यांसोबत भेदभाव करु नका. त्यामुळे ते करोना लपवून ठेवण्याची जास्त भिती आहे.