By  
on  

Finally ! तब्बल ५० दिवसांनी प्रार्थना आणि अभिषेकची झाली भेट

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.  दरम्यान, लॉकडाऊन अचानक गंभीर परिस्थिती पाहून जाहीर करण्यात आल्याने जे लोक कामानिमित्त किंवा काही कारणासाठी आपल्या गावी किंवा परराज्यात अडकले आहेत अशा व्यक्तींना योग्य त्या परवानगीने त्यांच्या घरी जाण्याची मुभा राज्यसरकारने दिली. 

मराठीतली चुलबुली गर्ल अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही लॉकडाऊनच्या काळात माहेरी म्हणजे भावनगरला अडकली होती आणि पतीच्या विरहाने व्याकुळ झाली होती. तू तिथे मी इथे ..अशी काहीशी या जोडीची अवस्था होती. पण  अखेर राज्यसकारच्या निर्णयामुळे प्रार्थनाला दिलासा मिळाला व तिने थेट पूर्ण परवानगीनिशी एकटी ड्राईव्ह करत मुंबई गाठली. अखेर तब्बल पन्नास दिवसानंत पती अभिषेकला भेटली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Back to bae .... @abhishekjawkar . . #homeback #withyou #after50days #happyquarantine #basic

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive