By  
on  

Lockdown: पाहा आई-बाबा पहिल्यांदा लाईव्ह जातात तेव्हा....

सध्या करोना संकटामुळे प्रत्येकजण सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत हा आपापल्या घरात सक्तीेन कैद आहे. घरी राहून करोनाला आपल्याला हरवायचं आहे. त्यामुळे  घरातूनच सध्या सोशल मिडीयावर स्करीय राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. सेलिब्रिटींसारखेच आपणसुध्दा आपल्.या मित्रमंडळींसोबत लाईव्ह जातो, धम्माल गप्पा-गाणी गोष्टी करतो. कधी-कधी वादसुध्दा घालतो. आता या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटता येत नसलं तरी हे लाईव्ह प्रकरण चांगलंच प्रकाशझोतात आलं आहे आणि याचा सेलिब्रिटींना तर भरपूर फायदा होतोय. 

पण तुम्ही कधी विचार केला आहे का....आपले आई-बाबा जर लाईव्ह गेले तर ते कशाप्रकारे गप्पा मारतील ..कसे रिअॅक्ट होतील.. त्यांच्या मित्रांच्या प्रश्नांवर काय उत्तरं देतील... फुटलं ना ..नुसत्या विचाराने हसू..अहो मग थांबा जरा हा व्हिडीओ नक्की बघा ..तुमच्या सर्वा प्रश्नांची धम्माल उत्तर तुम्हाला या व्हिडीओत मिळतील...हा व्हिडीओ तसा जुना आहे. 

'मुरांबा' सिनेमाच्या प्रोमोशनचा एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. पण तो आत्ताच्या लॉकडाऊन परिस्थितीशी अगदी मिळता-जुळता आहे. 
आई-बाबा म्हणून चिन्मयी सुमीत व सचिन खेडेकर या कलाकारांनी नेहमीप्रमाणेच अफलातून धम्माल उडवून दिलीय तर त्यांच्या साथीला अमेय वाघ व मिथीला पालकर या जोडीनेही 
जबरदस्त तडका लावला आहे. 

 

काय...मग हा व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या आई-बाबांना ईमॅजिन केलं की नाही...?
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive