By  
on  

 प्राजक्ताने या कारणासाठी मानले या सह कलाकाराचे आभार, जाणून घ्या कारण

लॉकडाउनमध्ये घरात बसलेले बहुतांश लोकं त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील बरेच दिवस तिचे काही जुने फोटो आणि आठवणी सोशल मिडीयावर शेयर करतेय. 
नुकतीच प्राजक्ताने तिच्या करियरमधीलएक खास आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे तिने सात वर्षांपूर्वी केलेल्या ‘सुवासिनी’ या मालिकेची.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback #series . दीड महिना ‘घरात बसल्यामुळे’ जशी ज्या ज्या देशात,शहरात फिरले त्याची आठवण येतेय; तशीच तब्बल दीड महीना अजिबात काम न केल्यामुळे ‘shooting ची, पूर्वी केलेल्या projects’ ची आठवण येतेय. . तशातच काल FB नं आठवण करून दिली- “7 Years ago, you posted this️” ४ मार्च २०१२ रोजी ‘सुवासिनी’ चं शूटींग सुरू झालं. तो संपूर्ण दिवस मला अजूनही तपशीला सकट आठवतो. . ह्या मालिकेदरम्यान माझ्या व्यक्तिगत आयूष्यातले खूप मोठे निर्णय मला घ्यावे लागले. पुणं सोडून मुंबईत स्थायिक होणं, नृत्य सोडू अभिनय हे Proffesion म्हणून निवडण्यापासून ते खूप काही ... . ह्या मालिकेतल्या “सावित्री” ह्या भुमिकेनं आणि माझ्या ह्या मित्रानं तेव्हा मला खूप आधार दिला. “सुवासिनीनं” मला आयूष्यभर पुरेल असा “खंबीरपणा आणि हा सखा” दिला . BTW- ह्यानंच मला त्यावेळी ओशोंच पुस्तक वाचायला दिलं होतं आणि काही वर्षांनी Art Of Living चा एक video पाठवला होता ️ @veekaas.patil ह्या गोष्टींसाठी; माझ्या संबंध आयूष्यात मी जी काही पुण्यकर्म करेन त्यातला काही भाग नेहमी तूला मिळत राहील #तथास्तू #मैत्रजीवांचे #आठवणींनाउजाळा #prajaktamali @

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

 

प्राजक्ताने या मालिकेदरम्यानचे फोटो पोस्ट करत ही  आठवण ताजी केली आहे.  घरात बसून प्राजक्ताला शूटींगची आणि पूर्वी केलेल्या प्रोजेक्ट्सची आठवण येत आहे. म्हणूनच तिने ही खास आठवण सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. सुवासिनी मालिकेच्या शूटींगचा पहिला दिवसासह या मालिकेसह पुणं सोडून मुंबईत स्थायिक होण्याची आठवण प्राजक्ताने सांगीतली. विशेषकरून या मालिकेत सहकलाकार असलेल्या विकास पाटीलचे प्राजक्ताने या पोस्टमध्ये विशेष आभार मानले आहेत. विकास विषयी प्राजक्ता लिहीते की, “ह्या मालिकेतल्या “सावित्री” ह्या भुमिकेनं आणि माझ्या ह्या मित्रानं तेव्हा मला खूप आधार दिला. “सुवासिनीनं” मला आयूष्यभर पुरेल असा “खंबीरपणा आणि हा सखा” दिला.  ह्यानंच मला त्यावेळी ओशोंच पुस्तक वाचायला दिलं होतं आणि काही वर्षांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा एक video पाठवला होता. विकास, ह्या गोष्टींसाठी; माझ्या संबंध आयूष्यात मी जी काही पुण्यकर्म करेन त्यातला काही भाग नेहमी तूला मिळत राहील.”  

 
असं म्हणत सह कलाकार आणि मित्र विकासचे प्राजक्ताने आभार मानलेत आणि या मालिकेच्या आठवणी लिहील्या आहेत. प्राजक्ताने या पोस्टमध्ये या मालिकेच्या सेटवरील फोटो शेयर केले आहेत.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive