पाहा Photos : ‘डॅडी’ची लेक योगिता अडकली लग्नबंधनात, लॉकडाउनमध्ये अभिनेता अक्षयसोबत असा पार पडला सोहळा

By  
on  

पिपींगमूनने दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनूसार प्रसिद्ध गॅंगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांचा आज विवाहसोहळा होणार असल्याची बातमी दिली होती. त्यानुसार आज या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. 

29 मार्च रोजी या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र लॉकडाउनमुळे ते होऊ शकलं नाही. मात्र मुंबई आणि पुणे पोलिसांच्या विशेष परवानगीने हे लग्न आज पार पडलं आहे. मुंबईतील दगडी चाळीत योगिता आणि अक्षय विवाहबद्ध झाले आहेत. यावेळी अरुण गवळी आणि परिवार उपस्थित होते.  

मुख्य म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी सोशल डिस्टंन्सचं पालन करण्यात आलं, सॅनिटायझर आणि मास्कही वापरण्यात आले.      

अक्षयने ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ ‘फत्तेशिकस्त’ अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तर योगिता ही   महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करते तसेच काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.

 

अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता.

 थोड्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं असलं तरी लॉकडाउननंतर रिसेप्शन सोहळा होणार असल्याचं बोललं जातय.

  

Recommended

Loading...
Share