लॉकडाउनमध्ये घरी असलेले बहुतांश लोकं त्यांचे जुने फोटो पाहुन त्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्या जुन्या आठवणी या सध्याचा काळात भरपुर आनंद देऊन जात आहेत.
अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदही तिच्या जुन्या आठवणींमध्ये रमतेय. आणि म्हणूनच तिने तिच्या लहानपणीचे फोटो नुकतेच सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये ती स्वत:च्या या फोटोंना ‘टॉम बॉय’ असं लिहीत पोस्ट केलय.
भाग्यश्रीच्या या गोंडस फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. ‘बालक पालक’, ‘उबंटु’, ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमांमध्ये भाग्यश्री झळकली आहे. मधील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. ‘आनंदी गोपाळ’ मधील या भूमिकेसाठी तिला विविध पुरस्कारही मिळाले आहेत.