By  
on  

‘सोनपरी’ मृणाल कुलकर्णी यांचा हा लुक आठवला का ? झळकल्या होत्या या मालिकेत 

लॉकडाउनमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. घरात बसून जुने फोटो पाहून त्या आठवणींमध्ये बहुतांश लोक रमत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या बाबतीतही ते चित्र पाहायला मिळतय. सध्या सोशल मिडीयावर कलाकार जास्तीत जास्त पोस्ट करताना दिसत आहेत. यात त्यांचे जुने फोटो सध्याच्या काळात जास्त पाहायला मिळत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hasaratein .. one of my most famous show on Zee TV ....many many years back

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मिडीयावर त्या जुने फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. यातच त्यांनी आणखी एक आठवण शेयर केली आहे. त्यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आहे. 90च्या दशकातली प्रसिद्ध मालिका ‘हसरते’च्या वेळचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hasaratein ...Zee tv

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

जयवंत दळवी यांच्या ‘आधांतरी’ या पुस्तकावर ही मालिका आधारित होती. मृणाल कुलकर्णी यांची या मालिकेत अस्मिता नावाची भूमिका होती. मृणाल कुलकर्णी यांचा हा जुना फोटो पाहून सोशल मिडीयावर या फोटोची चर्चा आहे. याच मालिकेतील आणखी एक फोटो मृणाल यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive