सध्या करोना संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे. सामान्यांपासून कलाकारांपर्यंत आज प्रत्येकजण सक्तीने घरी आहे. मग वेळ सत्कारणी लावण्यासाठी किंवा गुंतून राहण्यासाठी नवनवीन चॅलेंजेस घेण्याचं फॅड खुप वाढलं आहे.
असंच एक धम्माल चॅलेंज सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावेने घेतलं आहे. तो अभिनेता तर आहेच पण बाबाची भूमिका तो साकारतोय, म्हणजेच आता घरी लॉकडाऊनमध्ये कान्हा आणि मल्हार या दोन खोडकर मुलांचा बाबा म्हणून त्यांच्या सर्व बाललीला सुबोधला जवळून टीपता येतायत. त्यासाठीच त्याने हा धम्माल व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
#BachFUNMoments हे चॅलेंज स्विकारत सुबोधने कान्हा व मल्हारची घरातली दंगा-मस्ती या व्हिडीओत टिपली आहे. तर इतकचं नव्हे तर या चॅलेंजसाठी रवी जाधव व प्रसाद ओकला नॉमिनेटही केलंय.
तुम्हालासुध्दा हा व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही.