By  
on  

पाहा Video : अम्मू आणि मम्माच्या मदर्स डेनिमित्त शुभेच्छा रेकॉर्ड होतील ना?

आई ही व्यक्ती आपल्यासाठी खुप स्पेशल असते. घरात पाऊल ठेवल्यावर आई कुठे हा शब्द किंवा तिला शोधणारी आपली नजर....तिच्याशिवाय आपलं पानच हलत नाही. ...अशा या  वात्सल्यमूर्तीचा दिवस म्हणजे मदर्स डे. आजच्या युगात मदर्स डेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग सामान्य असोत किंवा सेलिब्रिटी. 

 तसं अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिच्या आईची अगदी सॉलिड टीम आहे. त्या दोघी नेहमी एकत्र धम्माल -मस्ती इतकंच नव्हे तर एकमेकींच्या खोड्यासुध्दा काढतना पाहायला मिळतात. त्यांचे व्हिडीओ म्हणजे शंभर टक्के एन्टरटेन्मेन्ट असतात. 

मदर्स डे उद्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे अम्मू आणि मम्माने मदर्स डेनिमित्त चाहत्यांसाठी खास शुभेच्छा रेकॉर्ड करण्याचं ठरवलंय. पण शुभेच्छा राहिल्या बाजूला ...या दोघी नुसत्या खळखळून हसू लागल्या आणि शुभेच्छा काही रेकॉर्ड झाल्या नाहीत. तरीसुध्दा हा खुप क्युट व्हिडीओ आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Amu - मम्मा १० मे ला “mothers day” आहे आपण छान शुभेच्छा रेकोर्ड करुया Mom it’s “Mother’s Day “ on the 10 th let’s just record a nice video Mamma - esshhhhh त्यात काय (Ofcourse why not ) PLEASE WATCH THE VIDEO AT YOUR OWN RISK Ps - since I fumbled a lot in the video WE “mom n me “ have decided to do an #instalive tomorrow ie 10 th may 2020 .... 4 pm to 6 pm We will be calling you and playing some amazing games .... and yes “you” meaning the children are secondary you have to make sure that your MOMS ARE THERE So it’s going to be me and my mom and you and yours #amunmammo #mothersdayspecial

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अम्मू आणि मम्माने शुभेच्छा जरी दिल्या नसल्या तरी त्या तुमच्यासाठी खास सरप्राईज घेऊन आल्या आहेत. त्या मदर्स डेनिमित्त इन्स्टालाईव्हवर तुम्हाला भेटायला येणार ाहेत व ४ ते ६ धम्माल गप्पा-गोष्टी व गेम्सही खेळणार आहेत. 

 

अमृता व तिच्या आईचे धम्माल टिक-टॉक व्हिडीओ खुपच व्हायरल होतात.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive