By  
on  

पाहा Video : ‘सेक्रेड गेम्स’चा काटेकर बनला रॅपर, पोलिसांसाठी गायलं रॅप साँग 

'सेक्रेड गेम्स'मधील काटेकर आता रॅपरही बनला आहे. विविध मराठी सिनेमे आणि नुकतच सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमध्ये काटेकरची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र जोशीचा रॅपर अंदाज समोर आला आहे. सध्याचा कोरोना व्हायरसचा सुळसुळाट त्यात लॉकडाउनची स्थिती यात देशातीला पोलिस, डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या वॉरियर्सना सॅल्यूट करणारं हे रॅप साँग आहे. विशेषकरून या परिस्थितीत सतत तैनात असलेल्या भारतीय पोलिसांसाठी जितेंद्र जोशीने हे रॅप साँग लिहीलय.

 

समीत कक्कड यांनी याचं दिग्दर्शन केलय, डब शर्माचं संगीत आणि जितेंद्र जोशीने हे गाणं लिहीलय आणि गायलं देखील आहे. घरातच राहून हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या रॅप साँगमधून पहिल्यांदाच जितेंद्र जोशीचा रॅपर अंदाज पाहायला मिळाला आहे. “थोडी इज्जत दिखा एक सैल्युट तो मार पुलिसवाला भी है इंसा वो भी पडता बीमार..” असे या रॅप साँगचे बोल  आहेत.
 'सेक्रेड गेम्स' या  वेब सिरीजमध्ये जितेंद्र जोशीची काटेकर नावाची पोलिसाची भूमिका होती. 'बेताल' या आगामी वेब सिरीजमधून जितेंद्र आणखी एका वेगळ्या भूमिकेत दिसेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive