By  
on  

 सायली संजीवच्या या सिनेमाचा टीझर झाला प्रदर्शित

काही स्वप्न पूर्ण होतात आणि जी स्वप्न पूर्ण झालेली नाहीत त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रवास काही वेगळाच असतो. याच स्वप्नांचा नक्षीदार प्रवास उलगडणारा मराठी सिनेमा आहे ‘गोष्ट एका पैठणीची’. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

अभिनेत्री सायली संजीव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.   अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.  

 

मात्र एकीकडे लॉकडाउनमुळे सिनेमागृह, चित्रीकरण, प्रमोशन या सगळ्या गोष्टी बंद असताना हा टीझर प्रदर्शित झाला आहे. मात्र आता सिनेमात कधी आणि कुठे येणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन या सिनेमाची निर्मिती करत आहेत. मात्र प्लॅनेट मराठीचा 'एबी आणि सिडी' हा सिनेमा लॉकडाउनमुळे प्रदर्शनापासून वंचीत राहिला. आणि म्हणूनच तो सिनेमा वेब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. 'गोष्ट एका पैठणी'ची या सिनेमाच्या बाबतीतही तेच होणार का हा सध्या प्रश्न आहे. लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचही मोठं नुकसान झालं असून या क्षेत्राचं कामही ठप्प झालं आहेत. त्यातच या सिनेमाच्या टीझर प्रदर्शनानंतर हा सिनेमा कधी आणि कुठे प्रदर्शित होईल याची उत्सुकता आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive