By  
on  

“एकटं कोणी नाहीये”, कलाकारांचं नवं रॅप साँग 

सध्या लॉकडाउन, कोरोना यावर विविध गाणी, व्हिडीओ, रॅप साँग करण्यात येत आहेत. यात अभिनेत्री पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांनी केलेलं रॅप साँग जरा हटके ठरतय.
'एकटं कोणी नाहीये' असे या रॅप साँगचे बोल आहेत. पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे या रिल आणि रियल लाईफ जोडीने हे रॅप गायलय.

 

सध्याच्या परिस्थितीवर हे गाणं भाष्य करतय. या कठीण परिस्थितीत आपण एकटं नसून आपण या संकटावर मात करु असा संदेश देणारं हे गाणं आहे. नुकत्याच सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओत बरेच मराठी यंगस्टर कलाकार पाहायला मिळत  आहेत. सोशल मिडीयावर हे गाणं चांगलचं चर्चेत आलं आहे. सुजय जाधव याने हे रॅप लिहीलं आहे. सौरभ भालेरावने याला संगीत दिंल आहे. आणि अनुपम बर्वेने हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. या व्हिडीओत ऋतुराज शिंदे, सायली फाटक, स्वानंदी टिकेकर यांच्यासह बरेच कलाकार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive