मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री अमृता खानविलकरही सध्या लॉकडाउनमध्ये घरात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकतच अमृताला तिच्या एका हिंदी सिनेमाची आठवण झाली आहे. हा हिंदी सिनेमा आहे राझी. या सिनेमाला नुकतीच 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृताने ही पोस्ट शेयर केली आहे.
या पोस्टमध्ये अमृता ही दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचे आभार मानतेय. ती लिहीते की, “धन्यवाद मेघना गुलजार मॅम, तुम्ही मला या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनवलात त्यासाठी धन्यवाद. ” या सिनेमातील अमृताच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.
‘राझी’ या सिनेमात अमृता खानविलकर एका मुस्लिम महिलेच्या भूमिकेद दिसली होती. मुनीरा सय्यद नावाच्या महिलेची ही भूमिका होती. या सिनेमात आलिया भट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत होते.