By  
on  

या अभिनेत्रीने असा केला क्वारंटाईन एक्सपेरिमेंट, अंगावर चक्क न्यूजपेपरचा ड्रेस

लॉकडाउनच्या या काळात घरात बसून विविध प्रयोग केले जात आहेत. त्यातच सोशल मिडीयावर विविध चॅलेजचा सुळसुळाट असल्याने हे चॅलेंजेसही करण्यात येत आहेत.  यातच युवा डान्सिंग क्विनची स्पर्धक आणि अभिनेत्री कृतिका गायकवाडही घरात विविध प्रयोग करतेय. घरकाम करत असताना ती स्वत:चं वेगवेगळे फोटोशूटही घरातच शूट करत आहे. यातच तिने नुकतेच शूट केलेले फोटो चर्चेत आले आहेत. याचं कारण आहे कृतिकाने केलेला नवा एक्सपेरिमेंट. होय कृतिकाने असा काही एक्सपेरिमेंट केला की नेटकरीही कमेंट्स करण्यावाचून राहिले नाही.

 

तर हा एक्सपेरिमेंट आहे नव्या ड्रेसचा आणि फोटोंचा. कृतिकाने न्यूजपेपरचा ड्रेस करून अंगावर घातला आणि त्यासोबत फोटोशूट केले आहे. अत्यंत क्रिएटीव्ह असलेल्या या एक्सपेरिमेंट्ससाठी कृतिकाच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत आहे. सध्या कलाकार मंडळी घऱातच असल्याने. घरातूनच स्वत:चे फोटोशूट करत आहेत. यात कृतिकाने तिच्या ड्रेसवर आणि फोटोंवर केलेला हटके प्रयोग चर्चेत आला आहे.


'युवा डान्सिंग क्विन'मध्ये स्पर्धक म्हणून दिसणाऱ्या कृतिकाने या शोमध्ये आत्तापर्यंत विविध प्रकारचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स दिले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive