By  
on  

लॉकडाउनमध्ये प्रसारीत होणाऱ्या पहिल्या नव्या मालिकेची होणार ऑनलाईन पत्रकार परिषद

लॉकडाउनमुळे एकीकडे चित्रीकरण बंद असल्याने मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालेलं असताना सोनी मराठी वाहिनीने उचललेलं धाडसी पाऊल कौतुकास्पद असल्याचं चित्र पाहायला मिळतय. चित्रीकरण आणि काम बंद असलं तरी घरातूनच चित्रीकरण करून घरातून काम करून प्रेक्षकांसमोर नवी मालिका आणण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. आठशे खिडक्या नऊशे दारं ही नवी मालिका कलाकारांनी घरात राहूनच चित्रीत केली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात टेलिव्हीजन विश्वात घरातून चित्रीत होणारा आणि सध्या प्रसारित होणारी ही पहिलीच नवी मालिका ठरली आहे. नुकतेच या मालिकेचे विविध प्रोमोही समोर आले आहेत. श्रीरंग गोडबोले या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. 

एवढच नाही तर या मालिकेची ऑनलाईन पत्रकार परिषदही पार पडणार आहे. लॉकडाउनमध्ये पार पडणारी मनोरंजन विश्वातील ही पहिलीच ऑनलाईन पत्रकार परिषद असेल. या ऑनलाईन लाईव्ह पत्रकार परिषदेला लीना भागवत, मंगेश कदम, श्रीरंग गोडबोले, समीर चौगुले हे झूम ऐप द्वारे जोडले जाणार असून सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे दोघंही लंडनमधून या ऑनलाईन पत्रकार परिषदेत सहभागी होतील. 

 

या पत्रकार परिषदेत या मालिकेसाठी घरातून काम करण्याचा अनुभव हे कलाकार शेयर करतील. त्यांचा हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला असेल यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive