By  
on  

 लॉकडाउननंतर टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील कामात हे बदल होण्याची शशांक केतकरची इच्छा 

सध्या लॉकडाउनमुळे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे  म्हणूनच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प  आहे. मात्र लॉकडाउननंतर जेव्हा पुन्हा चित्रीकरण सुरु होतील तेव्हा कोणते बदल झाले पाहिजेत याविषयी अभिनेता शशांक केतकरने एक सोशल मिडीया पोस्ट केली आहे. जेव्हा कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर चित्रीकरण सुरळीत सुरु होतील तेव्हा कलाकारांवरील आणि इतर तंत्रज्ञानवरील काम कमी व्हावं यासाठी शशांक केतकरने एक इच्छा व्यक्त केली आहे. विशेषकरून टेलिव्हीजन विश्वातली मालिकांचे टेलेकास्ट हे दिवस न करता 5 दिवस करण्यात अशी शशांक केतकरची इच्छा आहे.

या पोस्टमध्ये शशांक लिहीतो की, “Prominently Television industry मध्ये काम करणाऱ्यांसाठी एक मुद्दा मांडावासा वाटतोय. एका मालिकेचे आठवड्यातले 6 दिवस telecast करण्या पेक्षा, फक्त सोमवार ते शुक्रवार असं 5 दिवस telecast करता येईल का ? आता या कोरोना महामारीवर विजय मिळवल्या नंतर जर सगळं नव्याने सुरू होणार आहे, तर 5 दिवस टेलेकास्ट करता य़ेऊ शकेल. मला पूर्ण कल्पना आहे की निर्मामते आणि चॅनल्स यांच्या साठी हा खूप मोठा निर्णय असेल. पण खरच असं झालं तर लेखक, दिग्दर्शक, स्पॉट दादा, लाईट दादा, मेकअप दादा या सगळ्यांचाच मानसीक आणि शारीरीक ताण कमी होईल हे निश्चित. मला वाटतं उरलेले दोन दिवस दाखवण्यासाठी आता प्रत्येक चॅनलकडे त्यांच्या त्यांच्या फिल्म्स आहेत, रिएलिटी शो आहेत! जुने कार्यक्रम आहेत! हा कदाचित अत्यंत स्टुपिड मुद्दा असेल पण या विषयावर चर्चा व्हायला काहीच हरकत नाही!”

असं शशांकने पोस्टमध्ये लिहीलं आहे. काही कलाकारांनी आणि इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व्यक्तिंनी शशांकच्या या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया देत त्याच्या या मुद्द्याला दुजोरा दिला आहे. तेव्हा लवकरच या विषयावर कलाकार कोणती पावलं उचलतील? आणि त्यावर चॅनेलचा काय निर्णय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र आता मालिका विश्वासह इतर मनोरंजन क्षेत्रातील काम पुन्हा सुरळीत सुरु होण्यासाठी लॉकडाउन संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive