श्रेया बुगडेने माधुरीसोबतची ही आठवण केली शेयर

By  
on  

धकधक गर्ल माधुरीला एकदातरी भेटता यावं अशी कित्येकांची इच्छा असेल. काहींची ही इच्छा पूर्ण झाली तर काहींची पूर्ण व्हायची बाकी असेल. त्यातच मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीचही स्वप्न असतं की या सौंदर्यवतीसोबत एकदा तरी काम करावं. 


चला हवा येऊ द्या मधील विनोदवीर श्रेया बुगडेचं हे स्वप्न कधीच पूर्ण झालय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती कित्येकदा बॉलिवुड कलाकारांना भेटली त्यांच्यासोबत स्टेज शेयर केला. मात्र माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाला तिने एक खास आठवण शेयर केली आहे. एका मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी माधुरीने हजेरी लावली होती. यावेळी या सोहळ्यादरम्यान सुरु असलेल्या विनोदी परफॉर्मन्समध्ये माधुरीनेही सहभाग घेतला होता. या परफॉर्मन्स दरम्यान श्रेया बुगडेने चक्क माधुरीसोबत फुगडी घातली होती. साडी परिधान केलेल्या माधुरीने यावेळी साडी कमरेत खोचून घातलेली ही फुगडी उपस्थितांना कायमच लक्षात राहील.

श्रेयाच्या करियरमधील ही खास आठवण ती कायमच स्मरणात ठेवेल. हीच आठवण शेयर करत श्रेयाने माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday DIVA!! @madhuridixitnene

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on

 

Recommended

Loading...
Share