By  
on  

 सोनालीने केला लग्नाविषयीच्या या बातमीचा खुलासा, या चार पद्धतिने लग्न करण्याची आहे इच्छा 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या लॉकडाउनमध्ये नुकताच तिचा पॉडकास्ट शो सुरु केला आहे. ‘सोनाली सांगते ऐका’ असं या शोचं नाव आहे. आत्तापर्यंतच्या भागात सोनालीने बऱ्याच गोष्टींविषयी मनमोकळेपणाने सांगीतलं आहे. नुकत्याच तिच्या ‘लग्न घाई’ या भागात तिने तिच्या लग्नाविषयीच्या गोष्टी सांगीतल्या आहेत. 

या भागात सोनालीने तिला चार पद्धतिने लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगीतलं. पंजाबी, मराठी, कॅथलिक आणि चौथी पद्धत जोडीदाराच्या आवडीची असेल असं म्हणत सिनेमांच्या माध्यमातून अशा पद्धतिने लग्नाचे सीन केल्याचा किस्सा ती शेयर करते. ‘इरादा पक्का’ या सिनेमाच्या सिनमध्ये सोनालीच्या लग्नाच्या सीनला सेटवर आलेले बाबा सोनालीला पाहून ढसाढसा रडल्याचं ती सांगते. शिवाय आता सोनालीची उखाणा घ्यायचीही तयारी झाल्याचं ती सांगते. काही वर्षापूर्वी सोनालीचं नाव एका राजकीय व्यक्तिसोबत जोडलं गेल्याच्या प्रकरणाविषयीही ती बोलली. ही चुकीची बातमी समोर आल्यानंतर या बातमीवर व्यक्त न होणं आणि प्रतिक्रिया न देणं योग्य समजलं होतं. मात्र त्याचा त्रास तिला आणि तिच्या कुटुंबाला झाल्याचही ती म्हटली. “आपण जर एखादी गोष्ट केलीच नाही तर त्या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण द्यायला काहीच आवश्यकता नाही.” असं सोनाली या पॉडकास्टमध्ये म्हणते.


मात्र सध्या सुरु असलेल्या लग्नाच्या चर्चेवरही सोनाली या पॉडकास्टमध्ये शेवटी म्हणते की, “आत्ता मी लग्नासाठी तयार आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. आणी लवकरच तुम्हाला सगळ्यांना कळेल.”
सोनाली हे म्हणत असताना मागनं आवाज येतो की, “सोनाली येतेस का ? मुहूर्ताची वेळ झाली..”मात्र नेमका कोणता मुहूर्त ? सोनालीला मागून दिलेली हाक ही तिच्या बाबांची आहे का ? या सगळ्या गोष्टींविषयी सोनाली लवकरच सांगणार असल्याचं या पॉडकास्टमध्ये म्हणतेय. तेव्हा हा मुहूर्त नेमका कसला आहे यासाठी सोनालीच्या पॉडकास्टच्या पुढील भागाची प्रतिक्षा राहील. सोनाली यात शेवटी म्हणते की, “मी कुठे चाललीय कुठली वेळ झाली आहे ते कळेलच.” मात्र या भागात तिने कोणकोणत्या गोष्टी सविस्तर सांगीतल्या आहेत त्यासाठी तुम्हाला तिचा हा पॉडकास्ट एपिसोड नक्की ऐकावा लागेल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive