By  
on  

या अभिनेत्याला ओळखलत का ? हे आहे त्याचं पहिलं फोटोशूट

 

जेव्हा आपण आपले जुने फोटो पाहतो तेव्हा त्यात दडलेल्या आठवणी आनंद देऊन जातात. पुन्हा त्या आठवणींमध्ये आपण रमतो. सध्या लॉकडाउनमध्ये कला विश्वातील कलाकारही असेच आठवणीत रमले आहेत.
 लॉकाडाउनमध्ये सोशल मिडीयावर थ्रोबॅक पिक्चर्सचा ट्रेंड सुरु आहे. यातच सेलिब्रिटीचे कित्येक वर्षांपूर्वीचे जुने फोटो या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. या फोटोंमधील त्या जुन्या आठवणींना कलाकार या निमित्ताने उजाळा देत आहेत. 

 अभिनेता स्वप्निल जोशीनेही एक अशीच जुनी आठवण पोस्ट केली आहे. स्वप्निलने त्याचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. मुख्य म्हणजे हे जुने फोटो आहेत स्वप्निल जोशीच्या पहिल्या वहिल्या फोटोशूटचे. या जुन्या फोटोंमध्ये स्वप्निलचे विविध लुक पाहायला मिळत आहेत. या पोस्टमध्ये स्वप्निल लिहीतो की, “ पहिल्या गोष्टी या नेहमीच खास असतात. माझं पहिलं फोटोशूट. तुम्ही केलेली कोणती पहिली गोष्ट तुम्हाला आठवतेय.”
 असं लिहीत त्याने चाहत्यांनाही त्यांच्या आठवणी शेयर करायला सांगीतलं.

 

 

सध्या स्वप्निल जोशीच्या जुन्या मालिका, ‘उत्तर रामायण’ प्रेक्षक टेलिव्हिजनवर पाहात आहेत. शिवाय स्वप्निलने नुकतीच केलेली पहिली वहिली वेबसिरीज ‘समांतर’ साठीही त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
स्वप्निलने पोस्ट केलेल्या या थ्रोबॅक पिक्चर्सवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय ‘पिल्लू टिव्ही’ या त्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वप्निल त्याच्या ‘उत्तर रामायण’ मालिकेविषयीच्या आठवणीही शेयर करतोय.


 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive