By  
on  

अस्तादला आठवला शाहरुख खानचा हा डायलॉग, हे आहे कारण

लॉकडाउनमध्ये लग्न, वाढदिवस, सण, उत्सव हे सगळं घरातच करावं लागतय. कुठेही बाहेर न जाता या खास दिवसाचं सेलिब्रेशनही घरातच करावं लागतय. त्यातच एखाद्या व्यक्तिच्या वाढदिवसालाही घरातच राहून सेलिब्रेट करावं लागतय. मात्र हा दिवसही काहिंसाठी स्पेशल करत आहेत त्यांचे जिवलग आणि कुटुंबिय. 

अभिनेता आस्ताद काळेचा वाढदिवसही असाच साजरा होत आहे. गर्लफ्रेंड स्वप्नाली पाटील सोबत आस्ताद या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतोय. मात्र हा वाढदिवस खास करण्यासाठी स्वप्नालीने घरातच स्वादिष्ट केक बनवलाय. नुकतच आस्तादने याविषयीची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चक्क किंग खान शाहरुखचा प्रसिद्ध डायलॉगच त्याने लिहीला. तो लिहीतो की, “कहते हैं किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें मिलाने में जुट जाती है, मी हे केकविषयी बोलतोय. स्वप्नालीला माझ्या वाढदिवसासाठी केक बनवायचा होता. पण लॉकडाउनमुळे ते बनवणं कठीण होतं. पण अचानक सगळं व्यवस्थित झालं आणि मला घरात बनवलेलं हा स्वादिष्ट केक माझ्या वाढदिवसाला मिळाला. मी जवळपास 30 वर्षांनी घरी बनवलेला केक खातोय. धन्यवाद स्वप्नाली आणि धन्यवाद कायनात.”

लॉकडाउनच्या काळातही मिळालेला हा केक आस्तादसाठी आत्तापर्यंतचं सगळ्यात खास गिफ्ट असेल यात शंका नाही.अस्ताद काळेने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमे, नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वप्नालीसोबत लवकरच आस्तादचं लग्न होणार असल्याची चर्चा आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive