By  
on  

सोनालीने अखेर दिली साखरपुड्याची आनंदाची बातमी, वाढदिवसाला शेयर केला फोटो

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाच्या चर्चा कित्येक दिवसांपासून होत होत्या. शिवाय बिझनेसमन कुणाल बेनोडेकरसोबत ती लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमीही समोर आली होती. पिपींगमून मराठीने सोनालीचे कुणालसोबतचे एक्सक्लुझिव्ह फोटोही काही महिन्यांपूर्वी शेयर केले होते.  मात्र आता आज सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने एका महत्त्वाच्या गोष्टीची घोषणा केली आहे. सोनालीने वाढदिवसाच्या दिवशीच तिचा साखरपुडा झाला असल्याची आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. सोशल मिडीयावर सोनालीने तिच्या साखरपुड्याचा फोटोही पोस्ट केला आहे. 2 फेब्रुवारी 2020 मध्ये सोनालीने कुणालसोबत साखरपुडा केला असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Before my birthday ends, I want to mark it by making a SPECIAL ANNOUNCEMENT!!! Introducing my fiancé Kunal Benodekar! @keno_bear आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...!!! #sakharpuda #engaged #palindrome #02022020 #precovid #engagement #fiancé

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 


या फोटोत सोनाली पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसतेय. शिवाय कुणाल आणि सोनालीच्या या जोडीवर सोशल मिडीयावर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पिपींगमून मराठीकडून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर या गोड जोडीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive