अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे. नुकतच सोनालीने वाढदिवसाला तिचा साखरपुडा झाल्याचं सांगत तिने फोटो पोस्ट केले होते. मात्र सोनालीने त्यानंतर दिलेलं सरप्राईजही तिच्या चाहत्यांसाठी स्पेशल ठरलय. वाढदिवसानिमित्ताने सोनालीच्या चाहत्यांनी तिच्यासाठी चित्र, स्केच, कविता या गोष्टी भेट म्हणून पाठवल्या होत्या. आणि यापैकी काही चाहत्यांसाठी तिने नुकतच इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. या चाहत्यांशी गप्पा मारत असताना काही चाहत्यांनी तिची काढलेली चित्रे दाखवली तर काहींनी कविता वाचून दाखवल्या. तिच्या अभिजीत नावाच्या एका चाहत्याने या लाईव्हमध्ये सोनालीचं चित्र काढलं. एवढच नाही तर त्याने सोनालीचा कुणालसोबतच्या साखरपुड्याच्या फोटोचही चित्र रेखाटलं आहे. आणि कुणालसोबतचं हे पहिलं चित्र पाहून सोनालीने लगेचच त्या लाईव्हमध्ये कुणाललाही सहभागी करून घेतलं. आणि मग काय तिच्या चाहत्यांनाही तिच्या आयुष्यातील या खास व्यक्तिला भेटता आलं.
कुणाललाही चाहत्याने काढलेलं हे चित्र प्रचंड आवडलं. आणि सोनालीने कुणालची लाईव्हमध्येच चाहत्यांसोबत ओळख करून दिली. या लाईव्हमध्ये सोनालीने कुणालला मराठीतून बोलायलाही लावलं. सोनालीने या लाईव्हच्या सुरुवातीला चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असताना तिच्या लग्नाविषयीही सांगीतलं. यावेळी सोनाली पुढील वर्षी लग्न करत असल्याचं बोलली. शिवाय ‘ती आणि ती’ सिनेमाच्या शूट दरम्यान कुणालशी लंडनमध्ये भेट झाली असल्याचं ती बोलली.
कुणाल हा लंडनला राहतो आणि तो कामाच्या निमित्ताने तो दुबईत असतो. सोनाली आणि कुणाल दोघही सध्या दुबईत आहेत. सोनाली कुलकर्णीने दिलेलं हे सरप्राईज मात्र चाहत्यांसाठी कायम स्पेशल राहील यात शंका नाही.