By  
on  

 साखरपुड्याच्या या लुकमध्ये अप्सरा सोनाली कुलकर्णी दिसली इतकी सुंदर

सध्या लॉकडाउनमध्येही सगळीकडे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचीच चर्चा आहे. त्याची कारणं खूप आहेत. पहिलं कारण असं की सोनालीने या लॉकडाउनमध्ये सुरु केलेला पॉडकास्ट शो. ज्याला प्रचंड उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. या शोच्या माध्यमातून सोनाली तिच्या आवाजाद्वारे तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होऊ शकतेय. या शोच्या विविध भागांमध्ये सोनालीने तिच्या आयुष्यातील बऱ्याच महत्त्वाच्या गोष्ठी ऐकायला मिळत आहेत. 
त्यातच सोनालीने तिच्या वाढदिवसाला आणखी एक सरप्राईज दिलं. हे सरप्राईज म्हणजे तिने तिचा साखरपुडा झालं असल्याचं यावेळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं आणि पोस्ट केले तिच्या साखरपुड्याचे फोटो. याचवर्षी 2 फेब्रुवारीला सोनाली आणि फियान्से कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा झाला आहे.


तर नुकतच इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही तिने चाहत्यांना कुणालची ओळख करून दिली. 


चाहते या सगळ्या सरप्राईजच्या आनंदात होतेच तेवढ्यात सोनालीने आणखी एक फोटो पोस्ट केला. हा सोनालीचा साखरपुड्याचा फोटो आहे. या फोटोत सोनालीचं सौंदर्य आणखी खुलुन आल्याचं पाहायला मिळतय. सोशल मिडीयावर या सुंदर फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive