By  
on  

राकेश बापट म्हणतो 'मुंबई आपली आहे'

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरप्रकारची धडपड तो करत असतो. या सगळ्यामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ते हट्टाला पेटतात आणि मिळेल तो मार्ग ते निवडतात. मग भलेही तो मार्ग चुकीचा का असेना आणि यातूनच तो चुकीच्या मार्गावर जातो. याच संकल्पनेवर आधारित वंश एंटरप्राइजेस प्रस्तुत 'मुंबई आपली आहे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.

भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित 'मुंबई आपली आहे' हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. मराठी सिनेमात आधी कधीही न दिसलेला असा थरार 'मुंबई आपली आहे' या सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १९९३ साली मुंबईमध्ये जी गुन्हेगारी होती त्यावरच आधारित आणि तत्कालीन मुंबईची चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथा या सिनेमाद्वारे आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयचाही छाप पडणारा राकेश बापट हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारत आहे.

आत्तापर्यंत रोमँटिक हिरो ही इमेज असलेला राकेश बापट या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाद्वारे राकेश त्याची 'चॉकलेट बॉय' ची इमेज पुसणार हे नक्की.  यात राकेश सोबत मीनल पाटील हा नवीन चेहरा झळकणार आहे. तर हिंदी मालिका, सिनेमांमध्ये दिसणारा इकबाल खान हा याद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. इकबाल या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय या सिनेमात जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-वीज, नयन जाधव हे देखील यात हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ह्या सिनेमाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिले आहे.

ह्याची निर्मिती सुरेखा वामन पाटील यांनी केली आहे. तर कुणाल नैथानी हे या  सिनेमाचे सहनिर्माता आहेत. दमदार संवाद, तगडी स्टारकास्ट, ऍक्शनने भरलेला असा हा 'मुंबई आपली आहे' हा सिनेमा येत्या 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive