By  
on  

रवी जाधव यांचा आगामी सिनेमा 'रंपाट'; कोल्हापुरात सुरु आहे शुटींग

महाराष्ट्रातील प्रेक्षकांची आवड अचूक ओळखून त्यांना नेहमीच नवनवीन सिनेमे देणारे चतुरस्त्र दिग्दर्शक रवी जाधव आता लवकरच आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. या सिनेमाचं नाव त्यांनी नुकतंच सोशल मिडीयाच्या आधारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 'रंपाट' असं हटके नाव रवी जाधव यांच्या आगामी सिनेमाचं असून महत्त्वाचं म्हणजे त्याचं शुटींग कोल्हापुरात सुरु आहे. हा फोटो शेअर होताच सिनेमाबाबत चर्चांना एकच उधाण आलं आहे.

रवी जाधव पोस्ट शेयर करत म्हणतात,"कोल्हापूर. माझे आवडते शहर. येथे झी स्टुडिओ सोबत माझा पहिला चित्रपट ‘नटरंग’ चा नारळ वाढवला होता. त्यानंतर आज ९ वर्षांनी माझा आगामी चित्रपट ‘रंपाट’ च्या शूटींगची सुरुवात चित्रनगरी काेल्हापूर येथे होत आहे. झी स्डुडिओ सोबत हा माझा हा पाचवा चित्रपट. जसे त्यांचे सहकार्य आहे तसाच आपला आशिर्वाद सातत्याने पाठीशी असावा."

 

https://www.instagram.com/p/Brza_Vml37r/

 

झी स्डुडिओ सोबत रवी जाधव यांचा हा पाचवा सिनेमा असल्याने ते खुपच उत्सुक असून त्यांनी सेटवरचा टीमसोबतचा पहिला फोटोसुध्दा पोस्ट केला आहे. यातील कलाकार आणि कथानक अद्याप तरी गुलदस्त्यात असले तरी प्रेक्षकांसाठी मात्र रवी जाधव यांचा सिनेमा पर्वणीच ठरणार आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive