सर्वत्र कोरोनाचा सुळसुळाट असताना देशभरात लॉकडाउन सुरु आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच पोलिस कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. एकीकडे आपण घरात सुखरुप असताना दिवस-रात्र बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी वेगळ्या पद्धतिने आभार मानले आहेत.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये राहतात. आणि याच परिसरात असलेल्या ओशिवरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेथील पोलिस दिवस-रात्र अविरत काम करत असतात. आणि याच पोलिसांसाठी सराफ दाम्पत्यांनी खास आमरस पुरीचा बेत केला होता. सध्या आंब्याचा सिझन सुरु असल्याने निवेदिता सराफ यांनी या पोलिसांसाठी आमरस आणि पुरी बनवून पाठवल्या. याविषयी अशोक सराफ आणि निवेदिता म्हणतात की,"आम्हाला पोलिसांबद्दल आदर होता. पण आता संकटाच्या परिस्थितीत त्यांचं अविरत काम पाहून तो द्विगुणित झाला आहे. सध्या आंब्याचा मोसम आहे. त्यामुळे छोटंसं थँक्यू म्हणून आम्ही पोलिसांना आमरस पुरीचा बेत आहे."
@MumbaiPolice Appreciation from legendary Ashok Saraf. pic.twitter.com/41IgyRg0G2
— Sanjay Kadam. (@Sanjayk71784145) May 19, 2020
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याप्रती व्यक्त केलेली ही भावना खरच कौतुकास्पद आहे. सध्या लॉकडाउनमध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या या कोरोना वॉरियर्सना सलाम आणि या वॉरियर्सची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावणाऱ्यांनाही सलाम.