By  
on  

EXCLUSIVE : लॉकडाउनमुळे या अभिनेत्याचा लग्नसोहळा ढकलला पुढे, लग्नाची केली होती सगळी तयारी

लॉकडाउनमुळे बऱ्याच लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. कित्येक लोकांची कामही या लॉकडाउनमुळे ठप्प झाली आहेत. त्यातच काहींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीही यामुळे अडल्या आहेत.
अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचही या कालावधीत लग्न होणार होतं. मात्र कोरोनाचा सुळसुळाट आणि लॉकडाउन यामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. या लग्नाची सगळी तयारी झाली असल्याचं सिध्दार्थने पिपींगमून मराठीशी बोलताना सांगीतलं आहे. मात्र आता लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थिती कधी संपतेय याची सिध्दार्थ आणि मिताली वाट पाहत आहेत.


मागील वर्षी जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा थाटात पार पडला होता. हे सुंदर कपल साखरपुड्याच्या फोटोमध्ये अतिशय गोड दिसत होते. मात्र या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना दोघ्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता होती. ती त्यांनाही असेलच. मात्र आता हे लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थिती कधी संपतेय आणि सिध्दार्थ–मिताली कधी लग्नबंधनात अडकतील याचीच त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. सोशल मिडीयावर या गोड कपल्सचा मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय दोघं अभिनय क्षेत्रातही उत्तम कामं करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Reunion #backtomom #after55days #withpermission #safeandsound

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सिध्दार्थ आणि मिताली सध्या त्याच्या आईसोबत पुण्यात आहे. या परिस्थितीत आई एकटी असल्याने सिध्दार्थने परवानगी घेऊन मुंबई ते पुणे प्रवास करून घर गाठलय.

Recommended

PeepingMoon Exclusive