बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी जनतेला आपला आवाज वाटतो. बाळासाहेबांच्या अस्मितेचं, ओघवत्या वक्तृत्वशैलीची झलक आता सिनेमातून पहायला मिळणार आहे. संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ या सिनेमाचा मराठीतील ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही मिळत आहे.
या सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी भाषेत नवाजुद्दिनचा आवाजातील संवाद आहेत. मराठी भाषेतील सिनेमात सचिन खेडकर यांचा आवाज वापरला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंचा काळ पुन्हा अनुभवता येणं शक्य आहे.
या सिनेमाचा युएसपी आहे त्याचे दमदार डायलॉग्ज.
‘बाळ ठाकरे जेव्हा मुंबई पेटवतो, तेव्हा दिल्लीच्या बुडालाही चटके बसतात.’
‘माणसाची किंमत छाती किती इंचाची आहे यावर ठरवत नसतात…ताकद मेंदूत असते.’
‘ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर...’
या आणि अशा अनेक दमदार डायलॉगमधून ठाकरेंच्या खास संवादशैलीचं दर्शन घडतं.
या सिनेमाला सेन्सॉर कडून प्रमाणपत्र मिळालं नसलं तरी प्रदर्शनाची तारीखही जाहीर झालेली आहे. हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=INOTrg-wQgE