By  
on  

मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरीचा हा चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर

लॉकडाउनमध्ये सध्या एन्टरटेन्मेंटची भूक वेब प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात भागवली जात आहे. एकीकडे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद असताना मनोरंजन विश्वाचं काम ठप्प आहे. त्यातच काही चित्रपट आणि वेब सिरीज वेब प्लॅटफॉर्मवर येत आहेत. 

यातच आणखी एक मराठी चित्रपट आता वेब प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतोय. ‘डबल सीट’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित मराठी चित्रपट आता अमेझ़ॉन प्राईमवर पाहायला मिळेल. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच स्क्रिनवर एकत्र पाहायला मिळाली होती. आणि आता पुन्हा एकदा वेब प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट आल्याने हा चित्रपट ज्यांनी नाही पाहिला त्यांना पाहता येईल आणि ज्यांनी पाहिला त्यांनान पुन्हा पाहता येईल.
दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर स्वत: याविषयीची माहिती दिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive