हा आहे सुयश टिळकचा खास मित्र, असा साजरा केला त्याचा वाढदिवस

By  
on  

अभिनेता सुयश टिळकच्या आयुष्यात आहे एक खास मित्र. आणि याच  खास मित्राचा वाढदिवस त्याने नुकताच साजरा केला आहे. हा मित्र आहे त्याचा डॉग पेट. सुयशने त्याचं नाव मर्फी असं ठेवलय. मर्फी आता एक वर्षांचा झाला आहे. आणि सुयशने त्याचा वाढदिवस हटके पद्धतिने साजरा केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

♥️

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

लॉकडाउनमुळे सुयश काही दिवसांपूर्वी मुंबईत होता. जवळपास 2 महिन्यांनी तो नुकताच मर्फीला भेटला आहे. मात्र या वाढदिवसाचं खास प्लॅनिंग सुयशने केलं. मर्फीसाठी खास केकही यावेळी होता. शिवाय मर्फीला बो टाय असेलेले कपडेही घालण्यात आले. यावेळी मर्फीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सुयशने पोस्ट केले आहेत. शिवाय मर्फीचे लहापणापासून ते आत्तापर्यंतचे गोंडस फोटोही त्याने पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My Boy turns 1 today!!! Happy Birthday Murphy!!! ♥️♥️♥️ @murphy.beaglehound

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

सुयशने सोशल मिडीयावर मर्फीचं अकाउंटही तयार केलं आहे. या अकाउंटवर मर्फीचे गोंडस फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर सुयशप्रमाणे मर्फीचेही चाहते आहेत.

Recommended

Loading...
Share