लॉकडाउनमध्ये उमेश कामतला सापडली घरातली नवी आवडती जागा

By  
on  

अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट दोघही लॉकडाउनमध्ये घरीच आहेत. मात्र व्यायाम, कुकिंग या सगळ्या गोष्टी दोघं करत आहेत. नुकताच दोघांनी सोशल मिडीयावर घरातच शुट केलेला व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

मात्र नुकतच उमेश कामतने एक पोस्ट केली आहे. घरातील एका विशिष्ट जागी काढलेला हा फोटो आहे. ही जागा म्हणजे स्वयंपाक घर. या पोस्टमध्ये उमेश म्हणतो की, “घरातील नवीन आवडती जागा ... स्वयंपाक घर...(दोन महिन्यांपूर्वी फक्त खायला यायचो) सध्या इथे प्रयोग रंगत आहेत.”
तेव्हा उमेश सध्या कुकिंग करतोय. आणि कुकिंगमध्येही विविध प्रयोग सुरु असल्याचं उमेश या पोस्टमध्ये म्हणतोय. तेव्हा लवकरच एखादी छान रेसिपी किंवा पदार्थाचा फोटो तो सोशल मिडीयाव पोस्ट करेल याचीच वाट पाहावी लागणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All the beauty of life is made up of light and shadoW What say @priyabapat

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

एरवी चित्रीकरणात व्यस्त असणारे प्रिया आणि उमेश या लॉकडाउनमध्ये एकमेकांसोबत  क्वालिटी टाईम घालवत आहेत. उमेश आणि प्रिया मराठी मनोरंजन विश्वातील  प्रेक्षकांचं ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन आवडतं कपल आहे.

Recommended

Loading...
Share