By  
on  

मृणाल कुलकर्णी यांना आली त्यांच्या या शोची आठवण, या शोसाठी शिकल्या होत्या कथक

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. ते जुने सोनेरी क्षण पुन्हा नव्याने आठवले जात आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी केलेली कामं,त्यांनी साकारलेल्या भूमिका याविषयीच्या गोष्टी ते त्यांच्या चाहत्यांसोबत शेयर करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Getting trained under Pandit Uma Dogra Ji , Katthak Guru for UTV show Meera

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या देखील त्यांच्या  जुन्या आठवणींमध्ये रमल्या आहेत. काही दिवसांपासून त्या त्यांनी साकारलेल्या भूमिकांची आठवण करून देत आहेत. नुकतेच मृणाल कुलकर्णी यांनी त्यांचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. 'मीराबाई' या शोमधील हे फोटो आहेत. यासाठी त्यांनी कथकचे धडे घेतले होते. पंडीत उमा डोग्रा यांच्याकडून त्या त्यावेळी कथक शिकल्या होत्या. ही फोटो स्वरुपातली सुंदर आठवण त्यांनी या निमित्ताने शेयर केली आहे. 

मृणाल कुलकर्णी या त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर गेली काही दिवस त्यांच्या जुन्या मालिकांच्या आठवणी ताज्या करत आहेत.  चाहत्यांनाही त्यांच्या या जुन्या आठवणी पाहायला आवडतय. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive