सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे देशभरात लॉकडाउन आहे. या लॉकडाउनचा फटका विविध क्षेत्राला बसलाय. यात मनोरंजन क्षेत्रही आलच सध्या सगळ्या प्रकारचे चित्रीकरण, कार्यक्रम, नाटकांचे प्रयोग या सगळ्या गोष्टी बंद आहेत. आणि म्हणूनच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं आहे. सध्या मनोरंजन विश्वातील कलाकार, हातावर पोट असणारे इतर मंडळी, पर डे काम करणारी कर्मचारी या सगळ्यांनाच यामुळे विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहेत. मात्र कलाकारही यामुळे त्रस्त आहेत. पुन्हा जेव्हा सगळं सुरळीत झाल्यावर प्रेक्षक त्यांचं काम पाहण्यासाठी येतील का ? हा प्रश्न बहुता त्यांना भेडसावत असणार.
#लवकरचभेटू pic.twitter.com/xE8Ch8Nvnu
— Kedar Shinde (@mekedarshinde) May 23, 2020
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी याच परिस्थितीवर बोलणारा व्हिडीओ केला आहे. #लवकरचभेटू असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, “भरलेलं थिएटर रंगून गेलेले प्रेक्षक, हाऊसफुल्लच्या पाटीशी जोडलेली आमची नाळ, कोरोनाच्या संकटाचं ग्रहण लागलय खूप कठीण असेल पुढचा काळ. उद्या सारं सुरु होईल पण असेल का हाऊसफुल्लची पाटी ? तुमचं टेन्शन हलकं करण्यासाठी आम्ही नेहमीच असू तुमच्या मनोरंजनासाठी. संकटावर जिद्दीने मात करू आणि उद्याचा नवा दिवस गाठू. विश्वासाने म्हणूनच बोलतोय #लवकरचभेटू.”
#लवकरचभेटू pic.twitter.com/vyCBHbgraD
— SIDDHARTH JADHAV (@SIDDHARTH23OCT) May 23, 2020
अभिनेता सिध्दार्थ जाधवनेही केदार शिंदे यांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र त्यांच्या लवकरचभेटू हॅशटॅगने उत्सुकता आणखी वाढलीय. एकीकडे कलाकार घरात बसूनच विविध कलाकृती सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर घेऊन येत आहेत. हा देखील असाच काहीसा प्रयत्न असेल का ? कि नेमकं काय असेल? याची घोषण ते लवकरच करतील असं समजू. हे कलाकार त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी आसुसले आहेत. मात्र कोरोनाच्या संकटावर मात करून जेव्हा सगळं सुरळीत होईल तेव्हा लवकरच हे कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. तेव्हा वाट पाहायचीय मनोरंजन विश्व पुन्हा सुरळीत सुरु होतय याचीच.