पंधरा वर्षांमध्ये 'फर्जंद' साकारणाऱ्या अंकित मोहनमध्ये असा झाला बदल, पाहून तुम्हीही व्हाल हैराण

By  
on  

‘फर्जंद’ या मराठी चित्रपटातून अभिनेता अंकित मोहनच्या शरीरयष्ठीचं आणि अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. हिंदी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता जेव्हा मराठीत झळकला तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अंकितने त्याच्या भारदस्त शरीरयष्ठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. याच अंकितचं हे बॉडी ट्रान्सफॉरमेशन कसं झालं याविषयी त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वयाच्या 15 व्या वर्षाचा आणि आत्ताचा फोटो पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I had no clue the passion which I had at the age of 15 that passion will ever get justice after putting 15 years of non stop & blindfolded worship to my body.... in & as FARZAND !! you can say a blessed child or chosen soul but the amount of hardwork, pain , wounds , hurt , sweat , screams , sacrifice & pressure I had to face to get into the skin of Kondaji Farzand I cannot express in words. It was in my destiny that how gracefully & beautifully you accepted all my efforts and gave me unconditional love ️ THANK YOU NEVER SAY NO TO WORKOUT !!!! छ्त्रपति शिवाजी महाराज की जय हर हर महादेव

A post shared by अंकित मोहन (@ankittmohan) on

 

या पोस्टमध्ये अंकित म्हणतो की, “मला काहीच कल्पना नव्हती की वयाच्या 15 व्या वर्षी ज्या गोष्टीची आवड होती त्याला 15 वर्षांच्या अतोनात मेहनतीनंतर असा न्याय मिळेल. तुम्ही म्हणू शकता माझ्यावर लहानपणी आशिर्वाद होते. पण कोंडाजी फर्जंद यांच्या भूमिकेत शिरण्यासाठी ज्या संख्येने मी मेहनत करून, दुखणं काढून, घाम गाळून, त्याग करून या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. हे माझ्या नशीबात होतं की तुम्ही सुंदर पद्धतिने आणि कृपेने माझी ही मेहनत स्विकारली आणि माझ्यावर प्रेम केलत. धन्यवाद, वर्कआउटला कधीही नाही म्हणू नका. छत्रपति शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव.”

 

याआधी अंकित हा हिंदी मालिकांमध्ये जास्त झळकला आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘मन फकिरा’ या मराठी चित्रपटांमध्ये आणि ‘एक थी बेगम’ या हिंदी, मराठी वेब सिरीजमध्येही अंकित झळकला आहे.

Recommended

Loading...
Share