By  
on  

‘भाई- व्यक्ती की वल्ली’च्या मैफलित आळवला गेला भक्तीचा सूर

टीझरपासूनच ज्याच्या रिलीजची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे, असा सिनेमा म्हणजे ‘भाई- व्यक्ती की वल्ली’. महाराष्ट्राचं हास्यचैतन्य ज्यांच्या लेखणीत सामावलं होतं ते भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांच्या बायोपिकमधील गाणं रिलीज झालं आहे. मराठी संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारं, कोणत्याही संगीत मैफिलीचं मुख्य आकर्षण असणारं गाणं म्हणजे ‘कानडा राजा पंढरीचा’ हे होय. या गाण्यातील स्वरांनी रसिकांना भक्तीरसात न्हाऊ घातलं. भाई- व्यक्ती की वल्ली या सिनेमातून हे गाणं एका नव्या रुपात सादर केलं आहे. हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून यात केलेला नवा प्रयोग रसिकांना आवडेल यात शंका नाही.

https://www.youtube.com/watch?v=DWXbwSUxOW0

Recommended

PeepingMoon Exclusive