By  
on  

नाट्यरसिकांचं मनोरंजन करायला नव्या वर्षात येत आहे व्हॅक्युम क्लीनर

आजकाल ऑनलाईन शॉपिंगचं प्रस्थ बरंच वाढलं आहे. बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याऐवजी घरबसल्या खरेदी होत असल्याने या पर्यायाचा विचार केला जातो.

पण आता याच विषयावर बेतलेलं एक नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं नाव आहे, ‘व्हॅक्युम क्लीनर’. एका कुटुंबाने मागवललेल्या ऑनलाईन व्हॅक्युम क्लीनरची गोष्ट या नाटकात पहायला मिळणार आहे.

अष्टविनायक निर्मित या नाटकाचं लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या नाटकात निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांच्या भूमिका आहेत. या नाटकाच्या निर्मितीमध्ये निवेदिता सराफ यांचाही सहभाग आहे.

या नाटकाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या नाटकचा शुभारंभाचा प्रयोग ९ जानेवारी २०१९ मध्ये होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive