By  
on  

मला पाहायचय मी गिव्ह अप नाही केलं तर काय होतं ते – प्रार्थना बेहेरे

लॉकडाउनच्या या काळात कित्येक लोकं घरात बसून कंटाळली  असतील. दररोज त्याच त्याच गोष्टी करून त्यांना वीट आला असेल. त्यातच काहीच उत्साहवर्धक किंवा प्रेरणादायी गोष्टी सापडत नसतील तर सहाजीकच नकारात्मकता निर्माण होते. मात्र प्रार्थना बेहेरेची ही पोस्ट तुम्हाला प्रेरणा देईल आणि सकारात्मकताही निर्माण करेल.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. सध्या घरात राहून प्रार्थना तिच्या आरोग्याकडे, फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. यासाठी ती दररोज व्यायाम करतेय. याच दरम्यानचे काही पोटो तिने पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंचं कॅप्शन हे अतिशय सकारात्मक आहे. 

ती या पोस्टमध्ये लिहीते की, “ मला पाहायचय की मी गिव्ह अप नाही केलं तर काय होतं ते.”

म्हणजेच प्रार्थना कोणतीही गोष्ट सोडून न देता ती गोष्ट करत राहणार आहे. त्याच्यातून काढता पाय न घेत ती गोष्ट करत राहण्याचा सकारात्मक मेसेज तिने यातून दिला आहे. यात तिने वर्कआउटचा उल्लेख केला आहे.

तेव्हा लवकरच प्रार्थनाचे आणखी फिट फोटो पाहायला मिळतील यात शंका नाही. मुख्य म्हणजे  प्रार्थनाचे हे फोटो तिचा पति अभिषेक जावकरने पोस्ट केले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive