प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांना घरून दानधर्माचा वारसा मिळालाय. त्यांचे वडिल ज्येष्ठ अभिनेते चंद्रकात गोखले हे आपल्याय कमाईतील काही भाग हा भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देत असत. सध्या सुरु असलेला कोरोनाग्रस्त परिस्थिती लक्षात घेता विक्रम गोखले यांनी स्वत: मदत करत इतर कलाकारांनाही मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विक्रम गोखले यांनी नेहमीच ज्येष्ठ कलावंतांचा विचार केला आहे. आणि याचसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचं ठरवले आहे. जवळपास अडीज कोटी रुपये इतका याची किंमत असेल. ज्येष्ठ आणि एकटे राहणाऱ्या कलावंतांना आसरा आणि सहाय्य म्हणून ही जागा विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नावाने करुन देण्याची घोषणा केली आहे.
विक्रम गोखले यांनी केलेल्या या मदतीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी त्यांचे आभार मानले आहेत. विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आश्रम उभा करण्याचे त्यांनी ठरवले आहे.