By  
on  

Exclusive : आगामी वेब सिरीजमध्ये जितेंद्र जोशीचा लुक असेल हट्टा-कट्टा, बेतालच्या भूमिकेसाठीही वाढवलं वजन

अभिनेता जितेंद्र जोशी सेक्रेड गेम्स या हिंदी वेब सिरीजमध्ये झळकला आणि त्याची काटकेर ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सिरीजमध्ये काटेकर मेल्यानंतरही त्यांना दु:ख झालं होतं. आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बेताल या वेब सिरीजमध्येही जितेंद्र आहे. मात्र या वेब सिरीजमध्ये तो साकारतोय खलनायक. 

पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आगामी वेब सिरीजविषयीही सांगीतलं आहे. आगामी वेब सिरीजचं काम सध्या थांबलं असल्याचं तो म्हटला. शिवाय आगामी वेब सिरीजमध्ये त्याचा हट्टा - कट्टा लुक असल्याचे त्याने सांगीतले. याविषयी सांगताना जितेंद्र जोशी म्हटला की, "मी वजन मुळात वाढवलं होतं 'चोरीचा मामला' मराठी सिनेमासाठी.  माझ्या सलग दोन तीन कामासाठी वाढलेलं वजन हवं होतं. 'बेताल' मधील त्या कॅरेक्टरचं पोट असणं गरजेचं होतं. तर ते मी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आगामी मी जी वेब सिरीज करतोय त्याचं सध्या काम थांबलय. पण त्याच्यातही माझा हट्टाकट्टा लूक आहे." बेताल या वेब सिरीजमध्ये जितेंद्र जोशीचा वजन वाढवलेला लुक पाहायला मिळतोय. मात्र आगामी वेब सिरीजमध्ये त्याचा काय लुक असेल हे पाहणं रंजक ठरेल.

 

तेव्हा आगामी वेब सिरीजमध्ये जितेंद्र जोशीची काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा हा कलाकार प्रेक्षकांसाठी आगामी काळात काय घेऊन येईल यासाठी प्रेक्षका आसुसले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive